मी द्वेष करतो
मी द्वेष करतो
मी द्वेष करतो
या जातीयतेचा
माणसा माणसात
विष पेरणाऱ्याचा
मी द्वेष करतो
दगडाला देव
करणाऱ्यांचा
अंधश्रध्देपोटी सेंदुर
फासणाऱ्यांचा
मी द्वेष करतो
हुजरेगिरी करणाऱ्यांचा
स्वतःला गहान करून
तळवे चाटणाऱ्यांचा
मी द्वेष करतो
कोवळ्या कळ्या
खुडणाऱ्यांचा
पशुतुल्य व्यवहार
करणाऱ्या त्या
नराधमी गिधाडांचा
मी द्वेष करतो
पाशवी व्यवस्थेचा
लांडगे पोसणाऱ्या
कर्मठ अहंकाराचा
मी द्वेष करतो
आपल्या मतांचा
लिलाव करणाऱ्यांचा
संविधान बदलण्याचे
भाष्य करून
लोकशाहीचे खूण
करणाऱ्या षंढ प्रवृत्तीचा
मी द्वेष करतो
