मी आमदार झालो तर
मी आमदार झालो तर
मी यदाकदाचित बनलो आमदार
विकासावर माझी सारी मदार
सरकारी योजनांचे ठोठावून दार
जनतेच्या समस्यांचे करेल निराकार
मतदार संघाचा करणार उध्दार
निविदा प्रकियेचा मापदंड ठेऊन
दर्जेदार काम, संपवून त्यातील टक्के
काम होत नसेल, लोकाभिमुख होऊन
तर अधिकारी वर्गाला शाब्दिक बुक्के
मी फक्त जनतेचे एक माध्यम होणार
लोकसहभाग हाच विकासाचा पाया
पारदर्शकपणे सारी कामे करणार
जनतेचा विश्वास नाही जाणार वाया
