महन्मधुर नाते
महन्मधुर नाते
जय जय भारत माते
अपुले महन्मधुर नाते
अजिंक्य तू हे माते,
तुझे उपकार अनंते..धृ..
बाळ टिळक हो इथे जन्मले
घेऊन केसरीचा दरारा
इथे वाहतो मलयगिरीचा
शीतल गंधीत वारा
धवल हिमाचल या भूमीचा
जगात उन्नत माथा.
जय जय भारत माते अपुले महन्मधुर नाते....1..
गुलामगिरीच्या जोखडातूनी
मुक्त जाहली जनता
बापुतत्व अहिंसा नि सत्य
कास धरू या जगता...
घेऊ शिवबाचे शौर्य धडे आम्ही
जीवन साफल्य हो सर्वथा
जय जयभारत माते अपुले महन्मधुर नाते..... 2...
इथे परंपरांचा नित्य हो सन्मान
जन गण बाळगून अभिमान
सर्वधर्मसमभावात स्वतंत्र जागृत करू सकला
घेवू नवे तंत्र आणू विकासावर प्रभुता
जय जयभारत माते अपुले महन्मधुर नाते...3..
शहीदांना देऊन सलामी
घडवू भविष्य आगामी
भेदभाव हा सारा त्यागुनी
विषमता देऊ सोडूनी
सीमेवर सैनिकास ही मानवंदना शोभते...
जय जयभारत माते अपुले महन्मधुर नाते...4...
तिरंगी ध्वज हा वंद्य असे जगता
श्वेत, केशरी नि हिरवा,
दर्शवी पावित्र्य, त्याग आणि समता
नसे कुणाचीही मती पाशवी
श्रद्धासुमने अर्पू या तुजला भारत माते
जय जयभारत माते अपुले महन्मधुर नाते...5..
