STORYMIRROR

sandhya layaskar

Fantasy

3  

sandhya layaskar

Fantasy

तिरंगा अमुची शान

तिरंगा अमुची शान

1 min
167

तिरंगा अमुची शान

तिरंगा अमुचा अभिमान

नभी फडकत्या तिरंग्यास

आज अर्पूया श्रद्धासुमन..1..


तिरंग्याचे तीन रंग

भगवा हरित श्वेत सांगती

संपन्नता अन् त्याग अविरत

श्रमास नाही अन्य पर्याय

हाच मंत्र देई निळे चक्र अव्याहत..2..


तिरंग्यास असे राष्ट्रीय मान

सीमेवरती करती सैनिक रक्षण

उन, वारा, पावसातही नसे आराम

कुटुंबास विसरून, शत्रुस नसे अनुसंधान..3..


ध्वजासाठी गाऊ स्फूर्तीगान

ध्वज देशाचा अभिमान

कुणा कुणा ना करण्या देऊ

राष्ट्रध्वजाचा अपमान..4..


स्वातंत्र्यदिनास फडकवून राष्ट्रध्वजा

करू ध्वज वंदन

प्रिय हा राष्ट्रध्वज राखण्या

अर्पूया तन मन धन, प्राण..5..


कानी  ऐकू येता राष्ट्रगान

देशभक्तीने होई हुतात्म्यांचे स्मरण

स्वातंत्र्यासाठी ज्यांनी दिले प्राण

मनास चढे राष्ट्रभक्तीचे स्फुरण..6..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy