प्रेमाला बंधन नाही
प्रेमाला बंधन नाही
मी कशी ओळखू प्रीती मज भानच उरले नाही
तू अलगद फिरविशी मोरपीस मज शब्द सुचेना काही....1..
अशी मी पण लाजत लाजत तव मिठीत विसावून गेले
स्वप्नात पाहूनी चांदणीस तू सहजची मज कुरवाळीले...2..
तो स्पर्श तुझा रेशमी मज सांगूनी हळूवार गेला
प्रेमाला बंधन नाही घे मिठीत तूही मला...3..
तो गंधीत हर्षीत वारा मज गेला मोहरून
तव भेटीस आतुरले मी गेले घरदार विसरून..4..
झाडे वेली सजली विविध रंगी फुलांनी
मी तुझ्या संगती आज नाहले प्राजक्त फुल वेलींनी...5...
जाहले जरी किती वर्ष वाटे सहवास हवासा
प्रेमात पडूनी माझिया तू असाच रहा जवळी राजसा...6..

