STORYMIRROR

sandhya layaskar

Romance

3  

sandhya layaskar

Romance

घरटे प्रेमाचे

घरटे प्रेमाचे

1 min
244

तुझ्या माझ्या प्रीतीला आणिक काय हवं

मानवानंच आज दिलय घरकुल विणून नवं..1..


दोघे मिळून मांडूया संसार असा प्रेमाचा

कुठलाच कोपरा नसेल भांडण करण्याचा ..2..


मिठीत नाही घेतले तरी चोचीत देऊन चोच

छोट्या छोट्या पिलांस भरवेन ना रे प्रेमघास रोज..3..


ईवली ईवली पिले जातील जरी ऊडून

तरी पंखात त्यांना देईल बळ भरून...4..


तुझा माझा संसार उद्ध्वस्त होत असता

नाही सोडणार तुला मी खाईल कितीही खस्ता..5..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance