स्वातंत्र्यदिन चिरायू होवो
स्वातंत्र्यदिन चिरायू होवो
थोर महात्मे किती लढले
पुरुषार्थ साधूनी झुगारली परवशता
तळहातावर घेऊन प्राण
वाहिल्या रूधीररूपाने सरिता..1..
स्वातंत्र्याची आली पर्वणी
मुक्त झाली गुलामीतून जनता
व्यर्थ न होई बलिदान
तयांचे जाणून घेऊ अपुल्या न्यूनता..2..
नव्या युगाचे मंत्र प्रशंसक
नवनिर्माण करू स्वागता
नवे तंत्र अन् नवे मंत्र हे
प्रगतीपथावर नेऊ भारता...3..
नव्या दिशेचा घेऊन वसा
मनी ज्ञानदीप लावू करू संस्कृती जतन,
सैनिक होवून देशासाठी
आम्ही फडकत्या तिरंग्याचा ठेवू मान..4..
भारतभूला अर्पू तनमन
अन्यायाची आम्हा चीड
नसानसातून आज जागवू
नसे कुणाची जगण्या भीड (भिती)..5..
विज्ञानाची कास धरू या
निद्रिस्त जरी सारी जनता
दिव्यत्वाच्या तेजामधुनी
आज लाभली आहे दृढता..6..
स्वातंत्र्याची पंच्याहत्तरावी
अमृत महोत्सव आज स्वतंत्रतेचा
भारतभूषण आम्ही होवू
नवा मंत्र हा सृजनशीलतेचा..7
