महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
काय करू वर्णन
माझ्या राष्ट्राची गाथा
गर्जा महाराष्ट्र माझा
टेकविती सारे माथा।।
डोंगर दरी पर्वतातूनी
एकच येतो येथे नाद
देशरक्षणासाठी घाली
आहूती देऊनी सारे साद।।
या मराठी मातीने रोवला
झेंडा नेऊनी अटकेपार
शिवाजी राजांची महती
असती येथे अपरंपार।।
सह्याद्री कित्येकदा येथे
मदतीला गेला धावून
हा मराठी शुर मावळा
लढला प्राण पणाला लावून।।
अटकेपार रोवीला झेंडा
दिल्लीचे तख्त राखिले
आजही देती शौर्याच्या
येथे सारे जण दाखिले
आजच्या या पवित्र दिनी
एकची आहे मनी कामना
येथेच परत जन्म घ्यावा
हिच आहे आमची याचना।।
