महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
म- महाराष्ट्राचा
म- मराठी भाषेचा
म- मराठी माणसाचा
म- माणुसकीचा
म- मानाचा
म- मोठ्या मनाचा
महाराष्ट्र माझा...
पवित्र ही भूमी
संत महंतांच्या वास्तव्याची,
अन शूर वीरांच्या
अजब पराक्रमांची,
खुलूनी दिसते
येथेची विभिन्न वेषा,
परी सारेच बोलती
गोड मराठी भाषा.
खडकांच्या भूमीत या
हरितक्रांती तो घडवितो,
दिल्लीलाही झूकवुनी
यशाची पताका फडकवितो.
तू समजून घे
या महाराष्ट्र देशा,
पत्करता दुश्मनी
उरणार नाही लवलेशा...
