STORYMIRROR

Suchita Kulkarni

Tragedy

2  

Suchita Kulkarni

Tragedy

महापूर

महापूर

1 min
4.1K

थेंब थेंब पाण्यासाठी तरसत होती गावं

का रे पावसा बरसलास एवढा कितीच तु दिलास घाव

 

मुसळधार कोसळलास तू जीव लागला टांगणीला

नाकातोंडात पाणी गेले सारा गाव उध्वस्त झाला


संसाराच्या वेलीवर फुले फुलली होती दोन

आई बाबा अडकले पुरात कुठेच लागत नव्हता फोन


दाही दिशा पाणीच पाणी डोळ्यात अश्रूंचा पूर होता

माय लेकरांच्या जीवासाठी जीव साराघुटमळत होता


तांडव होते पाण्याचे भयाण होते रौद्र रूप

घराघरात शिरले पाणी तरंगू लागली वस्तू खूप


जीवघेणा पूर होता गाव झाली उध्वस्त सारी

जीवन रुपी नाव माझी लागेल का रे किनारी


का ग माय कोपलीस अशी काय आमचा गुन्हा होता

कवेत घेतलंस गाव सारं शिक्षा दिलीस जाता जाता


माय लेकरांची ताटातूट नको अशी करू बाई

भूकेजलेल्या वासरांना थेंब दुधाचा पाज आई


नकोस अशी थट्टा करू जीव लागला झुरणीला

काडी काडी जमवलेलं सारं मिळालं ग मातीला


चिखल झाला जीवनाचा दलदलीत अडकले सारे जीवन

बघा कसा हा खेळ मांडला फाटले सारे गगन

 

ठिगळ तरी कोठे लावू फाटले सारे आकाश 

माणुसकीचा हात देऊया सोडून सारे मोहपाश


वाईटा मागे चांगले असते असे चक्र असते म्हणे

माणूस म्हणून जगणे शिकलो शिकलो प्रेम करणे


जात पात धर्म विसरून एक होऊ आम्ही सारे

माणुसकी ही जात आमची आम्ही भारतमातेची लेकरे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy