STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

4  

Pandit Warade

Tragedy

महापूर

महापूर

1 min
486

मेघ काळेकुट्ट आले

घनघोर  बरसले

नृत्य तांडव करून

कसे थैमान घातले ।।१।।


क्षणार्धात पावसाने

नदी नाले फुल्ल झाले

सारे किनारे सोडून

तेव्हा धावाया लागले ।।२।।


घरदार गुरे-ढोरे

भांडीकुंडी वस्त्र वित्त

गेले वाहून पुरात

सारे डोळ्याच्या देखत ।।३।।


माय बाप मुले बाळे

कसे हतबल झाले

महापूरी विळख्याने

वाहुनिया सारे नेले ।।४।।


किती धावाधाव केली

सारा संसार जोडला

काळरुपी पावसाने

एका क्षणात मोडला ।।५।।


महापूररुपी मृत्यू

आला जबडा वासून

सापडले जे जे पुढे

सारे घेतले गिळून ।।६।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy