Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

महामेरू

महामेरू

1 min
178


राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ

 गुणवंत, संस्कारी ज्ञानाची खाण ;

ध्येय बाळगूनी शिवा घडविला

दिले हिंदवी स्वराज्याचे दान .


थोर आपले शिवाजीराजे 

अश्वावर होऊन स्वार ;

 दुष्मनां निर्दालण्या 

हाती धारदार तलवार .


स्वराज्याचा भगवा उंच

सह्याद्रीच्या शिखरी फडकला ;

घाव बसता शिवरायाचा

 दुश्मन जिवानिशी तडफडला. 


अफजलखानाचा कोथळा काढला

शाहिस्तेखानाची मोडली खोड ;

औरंगजेबास नमवणाऱ्या

 शिवबास जगी नही तोड .


हिंदवी स्वराज्यासाठी जीवाची

 बाजी लावून लढले ;

मर्द मावळ्यांच्या सोबतीने 

शिवराय महामेरू झाले .


 परस्त्रीला मातेसमान मानणारे 

रणवीर शिवराय महान ;

गरीब, अनाथ प्रजेचे 

शिवराय होते आशास्थान.


 वर्णू किती शिवरायांची

 ख्याती शब्दही अपुरे पडे ;

 ऐसा झाला जिजाईसूत

 ज्याच्यासाठी शत्रूही रडे .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational