STORYMIRROR

Sanket Sonar

Inspirational

3  

Sanket Sonar

Inspirational

स्मशान

स्मशान

1 min
203

चल गड्या एकदा स्मशानात जावू,

आयुष्याचं अंतिम सत्य पाहू..


जीवनभर पैश्यासाठी राबराब राबला

कैकदा स्वकीयांशी उद्धटपणे वागला,

त्यानेही निर्व्याज देहतो त्यागला..

चल त्या धन्याची दौलत पाहू...

चल गड्या एकदा स्मशानात जावू..!


जात-पात, देव-धर्म, यज्ञ-याग केले,

देवप्राप्तीसाठी व्रत वैकल्य केले,

पाहण्यादेवाला तीर्थासही गेले..

अश्यानांही आता चल अग्नि देवू..

चल गड्या एकदा स्मशानात जावू..!


दुष्कर्माने द्रव्य साधले,

लाच घेवून बंगले बांधले,

कित्तेकाला रस्त्यावर आणले..

चल त्यालाही मुठ माती देवू..

चल गड्या एकदा स्मशानात जावू..!


सुख, संपत्ती, नाव कमावले,

त्यानेही जवळचे राव गमावले,

तरी त्याचे मन ना शमले..

चल त्याचीही तिथे राख पाहू..

चल गड्या एकदा स्मशानात जावू..!


सदा त्यागभावाने जनसेवा केली,

देशासाठी ही शरीर संपत्ती अर्पिली,

मोह माया टाळून ज्यांनी नावे कमाविली,

चल त्यांना मनस्वी श्रद्धांजली देवू..

चल गड्या एकदा स्मशानात जावू..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Sanket Sonar

Similar marathi poem from Inspirational