STORYMIRROR

VINAYAK PATIL

Inspirational

3  

VINAYAK PATIL

Inspirational

माझा बाप

माझा बाप

1 min
351

सर्व गुणगणती आईची माया 

बाप म्हणजे घराचा पाया 


बाप म्हणजे काटेरी फणस खरे 

आतून पाहिला तर दिसे प्रेमाचे गरे 


मुलांसाठी राबे बाप दिवस-रात 

तहान भूक विसरूनी जागे रात- रात 


ढाल बनुणी सोबत पाठीशी 

कुणी वैरत्व न पत्करे माझ्याशी


बापाची माया असे सुगंध चंदनाचा

झिजला कितीही तरी सुगंध येई मायेचा  


जेव्हा बापाची पूर्ण होईल साठी 

बनु आम्ही त्यांच्या आधाराची काठी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational