महामारी की महागाई ?
महामारी की महागाई ?
धुमाकूळ घाली जगात कोरोना
खिळखिळी झाली अर्थव्यवस्था,
हळूहळू झालेल्या विषाणूंचा शिरकाव
बदलून टाके जीवन व्यवस्था..!!१!!
आर्थिक नुकसानीचा फटका
वाढवी महागाईचा विळखा,
कोरोना राहिला दूर आता
महागाईचा श्राप ओळखा..!!२!!
घरात खाणारी तोंडे वाढली
रोख पैशांचा ओघ थांबला,
कुटुंबव्यवस्थेत विघ्न पडले
महागाईने महामारी गिळला..!!३!!
शेतकरी डबघाईस आला
युवकांचा ही जोश संपला,
उद्योगधंद्यात मंदी आली
जनसामान्यांचा रोष वाढला..!!४!!
खचून न जाता मानवा
इच्छाशक्ती बळकट करा,
उपयोग करून उपाययोजनांचा
संकटास हरवण्याचा ध्यास धरा..!!५!!
