महालक्ष्मी
महालक्ष्मी
करवीर निवासिनी
महालक्ष्मी अंबाबाई
दगडी मंदिर छान
महालक्ष्मी माझी आई १
भवानीमंडपातच
देवालय उभे छान
गर्भगृही मुर्ती आहे
माझ्या अंबेची महान २
कोल्हापूर हे प्रसिद्ध
तीर्थक्षेत्र ते महान
अंबाबाईच्या दर्शने
हरते सर्वांचे भान ३
पुर्वाभिमुख मंदिर
उभी मुर्ती नाजुकसी
नवरात्र महोत्सवी
गळ्यात शोभते ठुसी ४
नवरात्र सण मोठा
पंचक्रोशीत प्रसिद्ध
महालक्ष्मी दर्शनाला
येती मोठ मोठे सिद्ध ५