मधुरंग प्रीतीचे..
मधुरंग प्रीतीचे..
मधुर वळणवाट अल्लड
मोरपंखी तुझाच वावर
वळुन पाहताना ऊन्हातुन
पुन्हा माझ्या मनास सावर||१||
परिमल केवड्यासम हवासा
बेधुंद तुझ्याच श्वासाचा
ह्दयात भिनलेेला जरासा
स्वप्नबिंदु माझ्याच ध्यासाचा||२||
मृदुंगापरी कोमल सुरांचा
आलाप तुझ्याच स्वरांचा
धुन सजलेली नव्याने
संगतीत माझ्याच गीतांच्या||३||
नयनांत विसावले मन
गुंतता तुझ्याच स्पंदनात
अंत:करणी प्रीत जन्मली
फुलली तीही माझ्याच अंगणात||४||

