STORYMIRROR

AnjalI Butley

Fantasy

3  

AnjalI Butley

Fantasy

मधुबाला नाही हाती लागली

मधुबाला नाही हाती लागली

1 min
586

मधुबाला नाही हाती लागली


सूट-बुट घालुनी

आत्मविश्वास चढवून

शिवधनुष्य हाती लेवून

सज्ज झालो वधुपरीक्षेसाठी...


'फोकस' होता मनातल्या 

मधुबालेस वरण्यास

पण धारातीर्थ पडल्या अनेक

'कांदे पोहे' च्या नावा खाली...


फिरतो अजुनही मधुबालेसाठी

सज्ज होवुन नवीन शिवधनुष्य लेवुन हाती

कांदे पोह्यांची पद्धत बदलून पाहिली

घेवून गेलो 'डेट'वर...


पण...मधुबाला नाही हाती लागली...

मधुबाला नाही हाती लागली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy