STORYMIRROR

Babu Disouza

Abstract

4  

Babu Disouza

Abstract

मौन साक्ष

मौन साक्ष

1 min
413

उत्तर आयुष्यात स्वप्नांचे रंग हे फिके होताना

संध्या छाया गडद होती तिमीराकडे जाताना


कातरवेळी उदासीची लहर पसरताना

हृदयांतरी भिनल्या या गूढ मारव्याच्या ताना


पर्णहीन वृक्षांच्या फांद्या नभास हात देताना

आकाश मात्र आत्ममग्न सांजस स्पर्श होताना


हळूहळू अस्तित्व कोमेजे चांदणे सजताना

विरघळे आक्षेप काळाचे बंधन पाळताना


खिन्नतेचे परिमाण कोणी मोजले सांगताना

मौन साक्ष अप्रत्यक्ष अनुभवांना मोजताना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract