STORYMIRROR

SWATI WAKTE

Inspirational

4  

SWATI WAKTE

Inspirational

मैत्रीचा हात

मैत्रीचा हात

1 min
469

मैत्रीचे नाते अतूट

जुळले माझे वृक्षाशी

सखा हा माझा गोजिरा

साथ वाटते त्याची हवीशी


तड्पत्या उन्हात देतो गारवा

खंबीरपणे राहून उभा

सखा माझा हा सोबती

पाऊस आणतो नभा


बघून त्याला मिळतो

डोळ्यांना माझ्या दिलासा

होते मी तृप्त

त्याच्या रक्षणाचा घेऊन वसा


निःस्वार्थ त्याचे प्रेम

करतो तो माझे पोषण

पुरवून अन्न,वस्त्र, निवारा

त्याचे कसे फेडू मी ऋण


माझा हा सखा गोजिरवाणा

आहे मला हवाहवासा

म्हणून करते वृक्षारोपण

देऊन घट्ट मैत्रीचा हात जसा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational