मायेची सावली
मायेची सावली
माय माझी जनु काही
संस्कारांच ज्ञानपीठ
सगळ मिळाले इथे
धरेवरी स्वर्गपीठ ||
घडवण्या आम्हा तीने
गाळले श्रमाचे मोती
कष्टुन रात्रंदिवस
भरवी घास ती ओठी ||
आमच्या सुखात तीने
शोधला स्वर्ग धरती
भरून पावते मन
गोकुळाची ये प्रचिती ||
धन्य जन्म जगी झाला
कुश मिळाली सत्कर्ती
देव मला ठाव नाही
माऊलीच देवमुर्ती ||
