माय मराठी
माय मराठी
वाहते रक्तातं माझ्या मराठी
गर्वांने सांगते, आहे मी मराठी,
संस्कृती माझी माय ती मराठी
अभिमानाची ती माय मराठी !!
रुजवू मराठी, फुलवू मराठी
चला बोलू फक्त मराठी !!
माझा शब्द माझे विचार मराठी,
माझा श्वास माझी स्फूर्ती मराठी,
माझ्या रक्तात मराठी
माझी माय मराठी !!
वाहते रक्तातं माझ्या मराठी
गर्वांने सांगतो, आहे मी मराठी,
संस्कृती माझी माय ती मराठी
अभिमानाची ती माय मराठी!!
काना-मात्रा वेलांटीनी नटली मराठी,
व्याकरणशुद्ध बोलून लेवूया ललाटी
महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी !!
