STORYMIRROR

Swapnali Nirawane

Action Classics Inspirational

3  

Swapnali Nirawane

Action Classics Inspirational

आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी

आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी

1 min
240

जगत राहावी, शिकत राहावी

समजत राहावी, हसत राहावी अशी ही माया

शब्दांच्याही पलीकडल्या भावनांना

अखंड उमलवणारी ही मातृभाषेची कोवळी माया

आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा!!!


आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर

प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर!

भाषेचा गजर कर, मराठी असल्याचा

नेहमीच साज कर

साजेसा जग तू मराठीचा माज कर

आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा!!!


घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला

मराठी भाषा फक्त भाषा नाही

तर ती ज्ञानाचा अथांग स्रोत आहे

भडकली तर तोफ आहे

फेकली तर गोफ आहे 

आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा!!!


म्हणुनच,

आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action