माय बाहेर पडते...
माय बाहेर पडते...
नभी चांदणे टिपूर
त्यात बाहेर पडते
लेकराच्या भुकेपायी
माय जगाशी भांडते
कलुषित नजरा त्या
दरदिसा ती झेलते
खाऊ पाहून लेकीच्या
हसु वदनी फुलते
रोज प्रवास मैलांचा
हसत ती तुडवते
गेली अंधारात अर्ध्या
चंद्र येता परतते
भुक बाळाची मिटली
आई मनी सुखावते
बाळ झोपेत असता
आईपण निभावते
