STORYMIRROR

vaishali vartak

Classics

3  

vaishali vartak

Classics

मावळत्या दिनकरा

मावळत्या दिनकरा

1 min
169

दिनभर प्रकाशूनी

सूर्य निघाला अस्ताला

क्षणभर घे विश्रांती 

सृष्टी सांगे आदित्याला


जाता जाता दिनकरे

रंगविले नभांगण

जशी सकाळी प्राचीला

केशराची उधळण


दाही दिशा हळदीच्या

संधी प्रकाशे धुंदल्या

मंद थंड पवनाने

तप्त झळा निवळल्या


गाई चालल्या गोठ्यात

परताती सारे पक्षी

दिनकर मावळता

नभी मोहक ती नक्षी


अर्ध्यदान देती जन 

दोन्ही करांना जोडून 

 सांजवात वृंदावनी   

माय नित्याने लावून   


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics