माते वंदन तुजला
माते वंदन तुजला
तु जिजाऊ तु सावित्री
अहील्याची तु लेक आहे..
तु शक्ती तु दुर्गा
आकाशात भरारी घेणारी स्त्री आहे..
तु आई तु माई
मायेचा ओलावा तु आहे..
तु ताई तु मैत्रीण
कठीण समयी साथ देणारी तु आहे..
घराला स्वर्ग करणारी तु
अन्नपूर्णा देवी ही तु आहे..
जगण्याला बळ देणारी तु
दुधाचे पांग फेडू न शकणार ताकत तु आहे..
हरहुन्नरी सगळ्या मध्ये अव्वल तु
स्त्री आहे म्हणून विश्व हे घर आहे..
लहानग्या आई भवानी तु
वाईट विचारांची नाश करणारी नारी तु आहे..
तु जन्मदाती तु संस्कुती
तु नाविन्याचा वसा तु बलिदान देणारी तु आहे..
लेक ही तु नव दुर्गेचे रूप तु
नवीन विचार तु नवा रोजचा संघर्ष तु आहे..
तु राधा अन् तू रुक्मिणी
कुलदीपक देणारी स्त्री तु आहे..
साऱ्यांचा भार सांभाळशील तु
तुझ्या या कामाला त्रिवार वंदन आहे..
