STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

2  

Ashok Shivram Veer

Tragedy

माफी मागते मी अशी

माफी मागते मी अशी

1 min
75

लेकरा माफी मागते मी अशी तुझी,

तुला जन्माला घालून चूक झाली माझी.

मी अशी ही अभागी दुबळी तुझी माय,

बाप हा दारुड्या असून नसल्यासारखा हाय.

लेकरा तुझ्यासाठी आता करू मी काय,

तुला अनाथ करुन अशी मरेल ही माय.

भगवंता आता तूची याचा बाप अन माय,

चालला निघून प्राण आता हालवना हात पाय.

भोग तू आता फळं कर्माची आमच्या,

अशी दुःखं ना येवोत नशिबी कुणाच्या.

लेकरा माफी मागते मी अशी तुझी,

तुला जन्माला घालून चूक झाली माझी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy