माणुसकीला जागवूया
माणुसकीला जागवूया
माणुसकी आज कुठेही, दिसत नाही कुणाकडे
मेळ बसेना कुणाचां , कुणी इकडे कुणी तिकडे
व्यस्त सगळेच आज, मग कोण जागवेलं
माणुसकी या नात्यालां , कोण बरे उठवेलं
कळेनां कसे काही,कदर कुणालाच नं येई
का कुणालां दिसत नाही,अन्याय भर रस्त्यात होई
दंगल जाळ पोळ,का असे जीवनातं
भावना सर्वांच्या मेल्या, जिवंतपणी सर्व स्मशानातं
जागवूया सर्व माणुसकीला, हातभार लाऊ देवपणालां
जीवन फुलुवू आनंदाने,अर्थ असेल मग जगण्यालां
