माणसे जोडणे
माणसे जोडणे
माणसे जोडणे आहे कला
आधी माणुसकीला जागा
मानवता हाची धर्म जाणा
बांधला जाईल प्रेमाचा धागा
नको मिथ्याभिमान मनी
वाणीत हवी साखर थोडी
सहकाराची भावना मनी
कोण करेल उगा कुरघोडी
जेथे तेथे नको मी पणा
त्रासदायक वाटे इतर जीवा
वाद विवाद शक्यतो टाळा
माघार घेण्याची नीती ठेवा
द्यावा सदा मान इतरास
नको मनी शंकेचे मळभ
निखालस भाव ठेवता
माणसे जोडणे होते सुलभ
तुकड्या-तुकड्यात नकाशा विश्वाचा
पाठी मागे होते माणसाचे चित्र
मानवाचे चित्र जोडले जाता
सहज झाला विश्वाचा मित्र
