माकडे
माकडे
इथे तिथे बसायची माकडे
फिदीफिदी हसायची माकडे
उगाच वाकुल्या मला दावती
उचापती करायची माकडे
बनून वाघ दावती ऐटही
भितीमुळे पळायची माकडे
लहान थोर मानला ना कधी
कुणासही छळायची माकडे
उड्या कुठूनही कुठे मारती
तळ्यातही पडायची माकडे
सुगंध देत घेत नाही कधी
गुलाबही खुडायची माकडे
बघून माणसे सुखी चांगली
पुढे पुढे करायची माकडे
