STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Inspirational

4  

Author Sangieta Devkar

Inspirational

माझ्यातली मी.

माझ्यातली मी.

1 min
870

तोडून सारे हे बंध,

आता बेधुंद मला जगायचे आहे.

वय सरले माझे म्हणून का,

आता पुन्हा मला फुलायचे आहे.

विसरून सारे राग ,लोभ,अबोला,

पुन्हा आता नात्यांना नव्याने सजवायचे आहे.

चालताना वाटेत माझेच मला सावरायचे आहे.

दुःखात ही आता सुखाला शोधायचे आहे.

आयुष्य पुन्हा एकदा भरभरून जगायचे आहे.

स्वप्नांची पालवी आता सत्यात उतरवायची आहे.

 काळजी ची विचारांची साखळी तोडायची आहे.

 माझ्यातल्या "मी" ला पुन्हा एकदा भेटायचे आहे.

 हरवले होते या साऱ्या पसाऱ्यात,आता मला माझ्या साठी जगायचे आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational