माझ्यात तुला शोधणे
माझ्यात तुला शोधणे
हळुवार तुज पाहणे पाहून मग लाजणे
नयनी तुला या साठवून घेणे
रोजचीच मीही रोजचाच तुही तरीही
वेगळे माझ्यात तुला हे शोधणे
चोरट्या नजरेने तुजला घायाळ करणे
तुझ्या घायाळीत माझे हे बेहाल होणे
रोजचीच मीही रोजचाच तुही तरीही वेगळे
माझ्यात तुला हे शोधणे प्रेमाच्या लपंडावात तू मला जिंकणे
तुझ्या जिंकण्यात मी मज हरवणे
रोजचीच मीही रोजचाच तुही तरीही वेगळे
माझ्यात तुला हे शोधणे हृदयाची कवाडं उघडून तुझी वाट पाहणे
माझी हुरहूर तू मिठीत घेणे श्वासात तुझ्या हे भान हरपून जाणे
रोजचीच मीही रोजचाच तुही तरीही वेगळे
माझ्यात तुला हे शोधणे जीव वेडावून तुला साद घालणे
माझी साद तुझा हातात हात आवडे
मला जन्मोजन्मी तुझ्या बाहुपाशात अडकणे
रोजचीच मीही रोजचाच तुही तरीही वेगळे माझ्यात तुला हे शोधणे

