प्राँमीस तुझं नं माझं
प्राँमीस तुझं नं माझं
अजन्म साथ मला देशिल का ?
येतील कीतीही संकटे
आपल्या आयुष्यात जरी
त्या संकटात सोबत देशिल का ?
येतील जातील कीतीही संकटे
न डगमगनारा विश्वास तु देशिल का ?
याच जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी
तुच मला साथ देशिल का ?
भांडण तंटा कमी करता करता
प्रेमाचा वर्षाव माझ्यावर करशिल का ?
रोजच्या आपल्या दिनचर्येतुन
आपल्यासाठी थोडा वेळ घेशिल का ?
एक प्राँमीस आज माझ्याकडून तुला
जेवढे सुख तुला देता येईल
तेवढे तेवढे मी तुला देत राहीन
काहीही झाले तरी मात्र
मी शेवटपर्यंत साथ तुलाच देईन
तुझ्याचसाठी मी जगत राहीन
तुझ्याच –हदयात मी सदैव राहीन
तुझ्याच सुखातील जोडीदार
अनं तुझ्याच दुखःतील भागीदार होईन
प्रत्येक जन्मी तुझ्याच सोबत राहत
असाच प्रेमवर्षाव करत राहीन
आजच्या प्राँमीस डे ला या
हेच प्राँमीस तुला मी करीन
हेच प्राँमीस तुला मी करीन

