प्रेमनदी
प्रेमनदी
प्रेम नदीला प्रेम पुर, आला रे अपार
धाव धाव ति, तिज खुणावतो सागर .
ओढ ओढ ती अंतरी, कधी मिळेल सागरी
खाच खळग्यांच्यी सरी, आता जमुना बावरी .
उत्साही उचंबळत, आली आली रे धावत
सविता स्तब्ध क्षणात, दुरुनी दे खोनी पर्वत .
मनी म्हणे एक क्षण, राहू कशी येथे अडून ?
रस्ता पाहे रत्नाकर, त्याचे करी मनी ध्यान .
ध्यान धरिता हृदयी, प्रेम शक्ती संचारली
बळे वळसा घालून, दूर केला मर्गीचा वल्ली .
प्रिया प्रियास भेटत, प्रेम ओसंडून वाहत
अडविल अवखळ प्रेमास, शक्ती नाही ऐसी जगात

