राजे विचारतात मला
राजे विचारतात मला
शक्तीपेक्षा युक्ती जास्त लढवणारे ,
सर्वश्रेष्ठ राजाचा बहुमान मिळवणारे ,
तेच शिवाजी महाराज करुनी हातवारे ,
मला विचारतात काय करताहेत माझे मराठे ।।१।।
परप्रांतीयांनी मुंबई गेली आहे भरून ,
अन् दादोजीही गेले आहेत महालातून निघून ,
अतिरेकी करतायत हल्ला लपून ,
महाराष्ट्रच राहिलाय दुबळा बनून ।।२।।
महाराष्ट्रच भविष्य हवं उजलायला ,
की प्रगतीच विसरतेय माझ्या मराठमोळ्याना
हे हवे आता कोठे तरी थांबवायला ,
नव्याने घडवायला हवे आता महाराष्ट्राला ।।३।।
माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी मला ,
का सगळेच विसरताय माझ्या किर्तीला ,
आता तूच सांग सारे मला ,
नाहीतर पुन्हा जन्म घ्यावा लागेल मला ।।४।।
