फक्त तूच...
फक्त तूच...
खरंतर फक्त तूच
आमच्यासाठी
राबराब राबतोस
आणि नेहमीच असा
नामानिराळा राहतोस
कित्येकदा कामावरून
दमून भागून येऊन
तू मला बर नसताना
घरकामात ही किती
मदत करतोस
बापासारखी माया लावून
माहेराची उणीव
भरून काढतोस
मला रे तू किती
जीव लावतोस
मी बरेचदा
तुझ्याशी मी भांडते
चिडचिड करते
पण तू शांत राहून
मला प्रत्येकवेळी समजून घेतो
ओंझळ भरली सुखांनी
आणखी काय बाकी आहे,
तुझ्यासोबत भरल्यासंसारात,
मी अगदी तृप्त मनाने
सुखी-समाधानी आहे

