माझ्या नजरेतून बघ....
माझ्या नजरेतून बघ....
माझ्या नजरेतून बघ...
अबोल बोल ही बोलके होतील
गुज माझ्या मनीचे
अलगद तुला सांगून जातील....
माझ्या नजरेतून बघ....
तू माझ्यासाठी काय आहेस नक्कीच तुला जाणवेल
तुही जीला शोधत होतीस
ती सखी तुला गवसेल....
माझ्या नजरेतून बघ....
तुझीच प्रतिमा झळकेल
माझा वेडेपणा आठवून
ओठांवरील कळी तुझ्या नकळतच खुलेल....
माझ्या नजरेतून बघ....
पवित्र आपल्या नात्यातील मर्म तुलाही कळतील
ऋणानुबंध आपले तरीही
कायमचे घट्ट होतील....

