STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Inspirational Others

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Inspirational Others

माझ्या मनातील गुढी

माझ्या मनातील गुढी

2 mins
170

गुढी  पाडवा  हिंदुचा

आहे  पहिलाच सण |

सुरु  होतो  नव  वर्ष 

गुढी  हिंदुचा  भूषण ||१||


गुढी   हिंदुचा  भूषण 

करा  साजरा  पाडवा |

यावे  सर्वाचे आयुष्यी 

खरा सुखाचा  गोडवा ||२||


खरा सुखाचा गोडवा

घरोघरी      पसरावा |

सर्व  द्वेष  व   मत्सर

प्रत्येकाने   विसरावा ||३||


प्रत्येकाने   विसरावा

कटू झाले काही गत |

आनंदाने  सर्व  करु

नव  वर्षाचे  स्वागत ||४||


नव  वर्षाचे  स्वागत

करु  गुढी  उभारून |

कोरोनास  दूर  ठेऊ

सर्व मास्क वापरून ||५||


सर्व  मास्क वापरून 

करा   नियम  पालन |

करा  घरीच  साजरा

गुढी पाडव्याचा सण ||६||


गुढी पाडव्याचा सण

देतो सुखाचा गोडवा |

सुरक्षित      अंतराने

पाडू कोरोना आडवा ||७||


पाडू कोरोना आडवा

आरोग्याची कास धरु |

माझ्या मनातील गुढी

छान  जोमाने  उभारु ||८||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational