माझ्या मना
माझ्या मना
मना का रे तू रडतोस
पूर्ण न होणाऱ्या अपेक्षा
का तू व्यर्थ बाळगतोस
सांग ना इतका का रडतोस
स्वार्थी आहे दुनिया ही
उगीचच का त्रागा करतो
मना सांग ना रे एकदा
इतका का रे तू रडतोस
जन हे दिल्या घेतल्याचे
अंतकाळीचा कोणी नसे
मना तुला हे माहीत असे
तरी का रे इतका रडतोस
प्रेम हे असतंच क्षणभंगुर
जातं ते लगेच विरून
इतका का रे तू त्रास करतोस
मना सांग ना तू का रडतोस
