माझं रान
माझं रान
भर पावसाळ्यातच करपला माझा मळा ,
मळ्यात त्या ऊनळ्यासारखी मातली झळा .
त्यातच वाळलेल माझं धान दाखवतो।
चला साहेब तुम्हांला माझं रान दाखवतो ॥ 1
गावात नाही चांगला रस्ता , गच्क्या चिखलाची करून कसरत .
बैल गाड़ी हाकताना बैलांची रस्त्यासह असलेली झुंज दाखवतो ॥
चला साहेब तुम्हांला माझं रान दाखवतो ॥ 2
गावातुन जायचं असत रानात ,
छोटी छोटी मुलं ही आमची काम करतात भर उन्हातान्हात .
काम करुन चिरन्या पडलेला त्या छोट्या मुलाचा हात दाखवतो।
चला साहेब तुम्हांला माझं रान दाखवतो ॥ 3
रानात कोरडी पडलेली विहीर , तिला तिला बसवले ला तुटका पोवरा .
अनं तीचा आटलेला झरा ही दाखवतो ।
चला साहेब तुम्हांला माझं रान दाखवतो ॥ 4
सुकलेल रान आण त्यात वाळलेल पीक ,
सदा सदा ढगाकड पाहून येरे यरे मनून माघीतलेली भीक .
करोनी ही विनंती त्याशि, निर्दयी झालेला तो पावूस ही दाखवतो ।
चला साहेब तुम्हांला माझं रान दाखवतो ॥ 5
लोडशेडींग असते आठवडी आमची ,
आठवडा भर दिवसा तर आठवडा भर रात्री .
रातव्यानी दिलेलं पाणी , बिन उजेडाच एकट्यानी ,
अनं आलेलं तेथे विंचूकाड्या रूपानी .
आमचं मरण ही दाखवतो । चला साहेब तुम्हांला माझं रान दाखवतो ॥ 6
मोटर लावले ली असते महिना भर ,
अनं दोन महिन्यातच आलेंल बिलं .
नसल्या मुळं पैसे कापले ल मोटरी च वायर ही दाखवतो ।
चला साहेब तुम्हांला माझं रान दाखवतो ॥ 7
वावर आमचं असूनही आमची तिथं सत्ता नाही ,
करता ऊद्ववस्त पिकं सारं कुठं कुटं नसावं तील पिकं त्याचा काय पत्ता नाही ?
माती मध्ये माळलेले अनं डुक्करानी नसावंलेल पिकं दाखवतो ।
चला साहेब तुम्हांला माझं रान दाखवतो ॥ 8
पडत नाही वेळेवर पाऊस , वळलेला असतो सारा उस.
कंटाळून सतत अश्या संकटाशी शेतकऱ्यांनी घेतलेला गळफास दाखवतो ॥
चला साहेब तुम्हांला माझं रान दाखवतो॥ 9
