.. माझं पिटुकलं...
.. माझं पिटुकलं...
... माझं पिटुकलं...
हरवले एकदा
हत्तीचे पिल्लू
चित्कार करून करून
हत्तीचा घसा लागला दुखू...
अजान ते पिल्लू
जंगलात भरकटलं
वेड बावरं होऊन
हत्तीला शोधू लागलं...
एवढ्या मोठ्या जंगलात
सापडेल का पिल्लाला वाट
सुरू झाली हत्तीच्या डोक्यात
एकेक विचारांची लाट...
असू दे सुखरूप माझं पिल्लू
हिंस्रांपासून राहावं चांगभलं
याच विचारात असताना हत्तीला
दिसलं लुटूलुटू येताना त्याचं पिटुकलं...
हत्तीच्या अश्रूंना
पारावार नाही राहिला
मायेने लागला चाटू
सोंडेने पिल्लाच्या शरीराला ...
नाही करणार पून्हा नजरेआड
नजरेतून माया वाहत होती
हत्ती व पिल्लाची जोडी
एकमेकांना बिलगून होती...
