STORYMIRROR

Sneha Kale

Romance Tragedy

3  

Sneha Kale

Romance Tragedy

माझं मन तुला कस कळत नाही

माझं मन तुला कस कळत नाही

1 min
322

माझं मन तुला कस कळत नाही

माझं प्रेम तुला कस कळत नाही

बोलायचं असत तुझ्याशी खूप काही

ऐकायचं असत तुझ्याकडूनही                 

पण तुला त्यासाठी वेळ काही मिळत नाही       

माझं मन तुला कस कळत नाही

आठवणींमध्ये मग मला मन रमवावे लागते

भूतकाळातले आयुष्य जगावे लागते

वर्तमान आणि भूतकाळ यांचा मेळ काही बसत नाही

माझं मन तुला कस कळत नाही

मी झाले पूर्णतः तुझी तू माझा कधी होणार

तुझ्या व्यस्त वेळेतून माझ्यासाठी वेळ कधी काढणार

माझी व्यथा तुझ्यापर्यंत पोहोचत नाही

माझं मन तुला कस कळत नाही

नाही का रे वाटत हातात हात घालून बसावं

पूर्वीसारखं एकमेकांच्या प्रेमात चिंब भिजावं

घडेल का तसे पुन्हा माहीत नाही

माझं मन तुला कस कळत नाही

किती आघात होतो माझ्या मनावर तुझ्या वागण्यामुळे

तुटून जाते मी पूर्णपणे तुझ्या दुर्लक्षामुळे

अश्रूंशिवाय माझ्या डोळ्यात काहीच उरत नाही

माझं मन तुला कस कळत नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance