STORYMIRROR

Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

माझं गाव

माझं गाव

1 min
125

माझं गाव म्हणून 

लोक गावा बाहेरच मिरवतात

एक गाव बारा भानगडी

हे मात्र नेमकं विसरतात


गावानं हाकलल म्हणून

गावा बाहेर पडतात

मनातल्या मनात सदा

गावाच्या नावाने खडे फोडतात


बाराच गाव असत

हे ते पुरतं जाणतात

गावाच नाव काढलं की

मग शिव्या शाप झोडतात


कौतुक असत मनात

म्हणून तर गावाचं

भल सदा चिंततात

आणि वेळ येता अंग बाजूला काढतात


गावानं लाथाडल तरी

गावावरच प्रेम करतात

गावा कडची महती

मोठ्या दिमाखात सांगतात


आपल्या देशात हीच

परिस्तिथी सर्वत्र दिसते

कारण प्रामाणिक माणसांची

संख्याच कमी असते


अशी मोजकी माणसं

गाव सोडून जातात

बेईमान लोकांना कायमचा

राम राम ठोकतात


ओळख गावाची लपवून

आनंदात जीवन जगतात

तेंव्हा मात्र पोटशूळ माणस

सावली होऊन येतात


सुखा समाधानाचं जीणं

त्यांचं इतिहास सांगून बरबाद करतात

कारण सत्य मागे उभे राहण्या आधीच

असत्याला गावभर फिरवून आणतात


द्वेष करणारी माणसं

अफवा माघारी पेरतात

मूर्ख माणसं ती पसरवत फिरतात

अती मूर्ख माणसं त्यावर विश्वास ठेवतात


असच जीवनात होत असत

म्हणून गाव म्हंटल ही

भल्या भल्यांच्या अंगावर काटा येतो

इज्जती साठी तो गाव नको म्हणतो


अस गाव बाबा शत्रुलाही

कधी स्वप्नात सुद्धा मिळू नये

चार खांदे अन एका मडक्यासाठी

प्रामाणिकपणाची फाशी कधी लागू नये


नशीब एकेकाच बकवत्तर असत

गेल्यानंतर गावाचं नाव जगा कळत

अप्रामाणिक पणाच मड जेंव्हा

गावाच्या वेशीबाहेर सुखाने जळतं....!!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action