ती...
ती...
होऊ अबला सबला
काळजात खोल दरी
सांग अंतरीचे दुःख
किती दाबू माझ्या उरी...१
झेप घ्यावी उंच नभी
पायी रुढींची साखळी
ठरे सबला अबला
मात्र का हो वेळोवेळी...२
नवनिर्मितीचे बीज
रूजवते वाढवते
रक्त शिंपुनी माझेच
बाजी जीवाची लावते...३
ठरे तरी दुय्यमचं
घरी-दारी ह्या भूलोकी
होऊ अबला सबला
आई घे उदरी लेकी...४
होवू अबला सबला
तीच जगतजननी
कुळ उद्धारील हो ती
जणू तुळस अंगणी...५
