STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

कधीतरी असे घडावे...

कधीतरी असे घडावे...

1 min
232

कधीतरी असे घडावे

स्वप्नातले सारे माझ्या सत्यात उतरावे.

आयुष्यात पडलेले अडगळीतले 

सारे प्रश्न ही सुटावे.


कुकर्माचा साऱ्या नाश व्हावा,

ओंजळीत संस्कृतीचा 

प्रत्येकाने वारसा जपावा.


कितीही मॉड जाहलो तरी 

अंगणातल्या "तुळशीस दिवा"लावावा;

तुम्ही कितीही "LED बल्प" लावा 

शोभा नाही ओ त्याला.


जातीभेद मिटवून प्रश्न 

कदाचित सुटतील ह्या काळी,

पण घरा-घरातील भेद मिटतील 

तेव्हा होईल खरी दसरा-दिवाळी.


तिनं त्याच्या घरच्यांना अन 

त्यांनी फक्त तिच्या मनाला समजून घावे, 

मग नांदेल घरदारात गोकुळ सारे.


जिथे मान होईल सदा जेष्ठांचा,

तिथे घासावा लागणार नाही 

उंबरा वृद्धाश्रमाचा.


जिथे माय-बाप लेकीस सांगेल 

महत्त्व एकोप्याचे,

तिथे प्रश्न उद्भवणार नाही 

कधीच वेगळ्या चुली पेटण्याचे.


कधी तरी असे घडावे.........

स्वप्नातले सारे माझ्या 

सत्यात उतरावे........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy