सण नारळी पौर्णिमेचा
सण नारळी पौर्णिमेचा
सण नारळी पौर्णिमेचा
उधाणलेल्या दर्याराजाला
प्रार्थना करून कार्यारंभ करण्यापुर्वी
नारळ अर्पण करण्याचा
सण हा कृतज्ञतेचा
कोळी बांधवाच्या आनंदाचा,सौख्याचा
रंगरंगोटी करून
बोटीची पूजा करत
एकविरा आईच्या आशीर्वादाने
होडी दर्यामध्ये उतरवण्याचा
दर्या राजा असे देव त्यांचा
रक्षण करता तो सकलांचा
सण नारळी पौर्णिमेचा
कोळी समाजाच्या नवचैतन्याचा
सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा
परंपरागत रम्यतेचा अन्
संकटाला हद्दपार करून
नवीन आव्हाने पेलून
यश मिळेल या प्रतिक्षेचा
असे मंगल दिन हा
नारळी पौर्णिमेचा...
