STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

2  

Manisha Awekar

Abstract

माझी माय

माझी माय

1 min
38

डोळ्यापुढे नित्य

आई तुझे रुप

तुज आठवावे

मनी एकरुप    (1)


कांती झळाळती

जणू कनकचि

तेज मुखावरी

साधे सोज्वळचि  (2)


बालपण माझे

फुलले मायेत

हात मदतीचा

सदा जीवनात   (3)


शब्द मोजकेच

सुमधुर वाणी

आता अंतरली

तव हाक कानी   (4)


शांत तुझी मूर्ती

बघता फोटोत

ठोका चुके मनी 

कळ अंतरात    (5)


निःस्वार्थी प्रेमाची

तू मांगल्यमूर्ती

गौरवाया तुज

नसे शब्दपूर्ती    (6)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract