माझी माय सावित्री
माझी माय सावित्री
संकटांना तोंड देत
मनाने खंबीर झालीस तू
स्त्री शिक्षणाचा ध्यास मणी घेवूनी
लढण्यास सज्ज झालीस तू
किती भोगले, किती सोसले
तरी मात्र निर्णयावर खंबीर राहिलीस तू
झेललीस तू अंगावर
शेणा मातीची घाण
देण्यास तुझ्या या लेकींना
विद्येचे ते ज्ञान
चूल आणि मूल
या पलीकडेही एक जग आहे
हे दाखविण्यास तू आम्हा
सोसलेस ओंगाळ विक्राळ
शब्दांचे ते मार..