माझ्या आईच्या अंतकरणातून
माझ्या आईच्या अंतकरणातून
माळरानाची पाऊल वाट
भुरकट होऊन गेली
दिसा मागून दिस
वर्ष कित्येक उलटून गेली
एक काळ होता तेव्हा
रूप हिरवळीने खुललं होतं
आता ना आवडती झाले
सर्वांची दुष्काळाने छळलं होतं
या तडतडत्या उन्हात
अंग अंग भेदाडलय
एका घोटासाठी पाण्याच्या
डोळे नभाकडे टवकरलय
कोणी औत, कोणी तीफन
कोणी नांगर फिरवतय
तसं अंग अंग मात्र
जणू वेदनेने शहरतयं
दगडा - ढेकळांना मात्र
घट्ट उराशी कवटाळून
आणू तरी कुठून
आता रडवयास आसवं
