Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

pooja balkrushna sangale

Others

3  

pooja balkrushna sangale

Others

श्रावण

श्रावण

1 min
157


कोवळ्या - कोवळ्या किरणांसमवेत 

दार ठोठावती अलगद श्रावण सर....

अवखळ वाऱ्याची अल्लड अशी लहर

झाडा- झुडपांना, पाना फुलांना

फुटतोया आता अनोखा बहर...

चोहीकडे हिरव्या वाटा, अनाड लाटा

त्यात संगतीला इंद्रधनुची ती

सप्तरंगी छटा....

तऱ्हे- तऱ्हेच्या तृनांची बहरलित

कोवळी नाजूक,साजूक फुले

डोळे दीपवती माझे

हिरवळ दाटे गडद चोहीकडे....

तवा क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात कोवळे उन पडे

होऊनी सूर्यास्त सांज झाली

असे क्षणो क्षणी मणी भासे....

थंड हवेची मंद झुळूक

कोकीळाही गाई अंगाई

नभांवर रेखीले जणू

सुंदरतेचे पर्व काही....

सुंदर हरिणी हिरव्या रानी

उंन्नाड होऊनी बागडे

चतुष्पाद ही चरती रानी

गोवारी गाणी गात फिरे....

परिजातकाची सुंदर फुले

सडा पडती दारो दारी

नेत्र सुखद होऊनी जाई

ही श्रावण मासाची छटाच न्यारी...  


Rate this content
Log in